निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा टळली , न्यायालय आणि निर्भयाच्या आईने दिली हि संतप्त प्रतिक्रिया…..

बहुचर्चित दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघा दोषींना उद्या फाशी देण्याची तयारी झाली होती. पण दोषींपैकी एक असलेल्या पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली असून या याचिकेवर निर्णय झालेला नाही. यामुळे चौघांना उद्या होणारी फाशी टळली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टने स्थगिती दिलीआहे. आधीच्या आदेशानुसार निर्भयाच्या दोषींना उद्या म्हणजे ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार होती. पतियाळा कोर्टाच्या स्थगितीने दोषींची फाशी तिसऱ्यांदा टळली आहे. दरम्यान तुम्ही आगीशी खेळत आहात अशा शब्दात न्यायालयाने दोषींच्या वकिलांना फटकारलं तर निर्भयाच्या आईने संताप व्यक्त केला आहे.
देशभर गाजलेल्या निर्भयाच्या सर्व चार दोषींची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्याचे सांगण्यात येतं होते , त्यानुसार तिराह तुरुंगात त्यांना फासावर लटकवण्यासाठी तयारीही सुरू झाली होती. पण चौघा दोषींपैकी एक असलेल्या पवनच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींनी निर्णय दिलेला नाही. त्याच्या दया याचिकेवर निर्णय व्हायचा आहे. हे समोर आल्यावर पतियाळा हाऊस कोर्टाने दोषींना उद्या होणाऱ्या फाशीवर स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात येत असल्याचं पतियाळा हाऊस कोर्टाने सांगितलं.
न्यायालयाने क्युरेटीव आणि दया याचिका दाखल करण्यात लावलेल्या विलंबावरून कोर्टाने दोषींच्या वकिलांना सुनावले. आम्ही राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे त्यामुळे उद्याच्या फाशीवर स्थगिती द्यावी, असे दोषी पवनचे वकील ए. पी. सिंह म्हणाले. यावर कोर्टाने त्यांना दुपारनंतर सुनावणीला येणास सांगितले. दुपारनंतर झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोषी पवनचे वकील ए.पी. सिंह यांना “तुम्ही आगीशी खेळाताय. साधव राहा. कुठलंही चुकीचं पाऊल टाकलं तर त्याचे भयंकर परिणाम होईल” , अशा शब्दात न्यायालयाने फटकारले.
निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया
निर्भयाच्या दोषींना उद्या होणाऱ्या फाशीवर पतियाळा हाउस कोर्टाने स्थगिती दिल्याने निर्भयाच्या आईने ” आपल्या देशातील यंत्रणा ही गुन्हेगारांना पाठिशी घालणारी आहे, ‘निर्भया’च्या दोषींना नक्की कधी फाशी दिली जाईल? असा संतप्त सवाल त्यांनी सरकार आणि कोर्टाला केला. दोषींना फाशी देण्याच्या आपल्याच निर्णयावर अंमलबजावणी करण्यात कोर्ट इतका वेळ का घेत आहे ? सतत दोषींची फाशी टाळणे , हे यंत्रणांचे अपयश आहे. पण तरीही मी हरणार नाही, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली.