कोरोना व्हायरसबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला हा खुलासा…

सीधा प्रसारण !! कोरोनावायरस पर भारत की तैयारियों को लेकर डॉ हर्ष वर्धन, केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री की प्रेस वार्ता https://t.co/7Vzn9wadhj
— DrHarshVardhanOffice (@DrHVoffice) March 2, 2020
भारतात चीनहून परतलेले कोरोना व्हायरसचे पहिले ३ रुग्ण बरे होत नाही तोच आता महाभयंकर असा कोरोनाव्हायरस (COVID-19) भारतात पुन्हा आला असल्याचे वृत्त आहे. देशात कोरोना व्हायरसचे आणखी २ रुग्ण आढळून आलेत. नवी दिल्ली २ आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
कोरोनाव्हायरसचे Covid 19 आधीचे ३ रुग्ण चीनहून आले होते. तर आता आढळून आलेले रुग्ण इटली आणि दुबईहून भारतात आलेत. नवी दिल्लीत आलेला रुग्ण इटलीहून तर तेलंगणामधील रुग्ण दुबईहून भारतात आला. या दोघांनाही आता वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
भारतात कोरोनाचा सर्वात पहिला रुग्ण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सापडला होता. त्यानंतर आणखी २ रुग्ण सापडले. हे तिघंही केरळातील होते. त्यांच्यावर उपचार झाले, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली. कोरोनाव्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देतं आहे. फक्त चीनच नव्हे, तर इतर देशातही हा व्हायरस झपाट्याने पसरतो आहे. भारताने हा लढा जिंकला, आता पुन्हा कोरोना भारतासमोर आव्हान बनून उभा राहिला आहे.
दुखणे अंगावर काढू नका
आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घ्या. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही सर्व लक्षणं कोरोनाव्हायरसची आहेत. त्यामुळे सामान्य म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. शिवाय कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक असे उपाय करा. हात स्वच्छ धुवा, शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका, शिवाय प्राण्यांपासून दूरच राहा.
कोरोनाव्हायरसमुळे जगभरात सोमवारपर्यंत ३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८८,००० पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे. चीनमध्ये या व्हायरसचा उद्रेक झाला आणि आता ६० पेक्षा अधिक देशांमध्ये या व्हायरसने थैमान घातलं आहे. चीननंतर इराणमध्ये या व्हायरसने सर्वात जास्त लोकांचा जीव घेतला आहे. इराणमध्ये मृतांची संख्या ५४ वर पोहोचली आहे, तर ९७८रुग्ण आहे. तर चीनपाठोपाठ दक्षिण कोरियात या व्हायरसचे सर्वाधिक ४,३३५ रुग्ण आहेत.