ऐकावे ते नवलच !! बेरोजगार तरुणांना औरंगाबादेत दिले जात होते दरोड्याचे ट्रेनिंग , प्रात्यक्षिकही केले पण पुढे काय झाले तुम्हीच पहा….

औरंगाबाद- गेल्या तीन महिन्यांपासून बायजीपुर्यात किरायाने खोली घेऊन अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना दरोड्याची ट्रेनिंग देणार्या रेकाॅर्डवरच्या दोन चोरट्यासहित आठ जणांच्या टोळीला शेंद्रा एमआयडीसी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.चिकलठाणा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. त्यांच्या ताब्यातून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहेनशहा शब्बीरशहा (२४), मेहबुबशहा सलीम शहा (२१),भिमराव दयाराम वानखळे(१९) शेख आसिफ शेख इब्राहिम (२१) सर्व रा.पिंपळखुंटा ता.पातुर जि.अकोला,मोबीन मोहब्बतखान अत्तारशहेनशहा (३९),मौहसिनखान मोहब्बतखान अत्तार(३५)दोघेही रा. शाकरशा ता.मेहकर जि.बुलढाणा, शेख जावेद शेख हबीब (२१) रा.रेंगटीपुरा जिन्सी, शेख युनुस शेख मोहम्मद (२०) रा.पळशी ता.सोयगाव हल्ली इंदीरानगर गारखेडा अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील शहेनशहा शब्बीर शहा आणि मोबीन मोहब्बतखान अत्तार हे दोघे पुणे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील चोरटे आहेत.यांनी गारखेडा परिसरात राहणार्या शेख युनुस शे मोहम्मद आणि जिन्सी परिसरातील शेख जावेद च्या मदतीने बायजीपुर्यात तीन महिन्यांपूर्वी खोली किरायाने घेतली. त्या ठिकाणी शहेनशहा शब्बीर शहाने अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून आणलेल्या चौघांना चोरी कशी करायची याची ट्रेनिंग दिले. व शेंद्रा परिसरातील व्ही.एस. मेटल्स अल्यूमिनिअम या कंपनीवर १६ फेब्रुवारी रोजी प्रात्यक्षिक दरोडा घातला.
कंपनीत झोपलेल्या तिघांचे हातपाय बांधून त्यांचे मोबाईल आणि पर्स हिसकावले व कंपनीतील भंगार आणि अल्यूमिनिअम असा १लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी परिसरातून ३२ क्विंटल अल्यूमिनिअम, भंगार आणि १८ टायर लंपास केले. हा सर्व चोरीचा माल शेख जावेद शेख हबीब ने खरेदी केला होता. या सर्व घटनाक्रमाची माहिती खबर्याने पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना दिली. पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय भगतसिंग दुलंत,पोलिस कर्मचारी गणेश मुळे, नवनाथ कोल्हे,योगेश तरमाळे, एपीआय महेश आंधळे यांनी पार पाडली.