कलम ३७० नंतर पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे पुढचे पाऊल , संघाचे प्रवक्ते राम माधव यांचे प्रतिपादन

काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे हे अखंड भारताच्या उद्देशाचे पहिले पाऊल होते . आता पुढचे पाऊल हे पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी विज्ञान भवनात आयोजित छात्र संसदेत बोलताना केले. अखंड भारताचे स्वप्न कधी साकार होईल? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांनी छात्र संसदेत राम माधव यांना केला. त्याला उत्तर देताना राम माधव यांनी हे उत्तर दिले. याविषयी बोलताना राम माधव पुढे म्हणाले कि , हे स्वप्न एकदम नव्हे तर टप्प्या टप्प्याने पूर्ण होईल. पहिली गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीर हे आतापर्यंत मुख्य प्रवाहात नव्हते. ते राज्य आता कलम ३७० रद्द झाल्याने देशाशी जुळले गेले आहे. आता पुढले लक्ष्य हे भारतीय जमीन परत मिळवण्याचे आहे. ही जमीन जी अवैधरित्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रस्ताव संसदेत १९९४ मध्ये मंजूर करण्यात आला होता, अअसे राम माधव म्हणाले.
आजची पिढी महत्त्वाकांशी आणि व्यवहारीक आहे. कारण ही पिढी तरुणांची आहे असे सांगून ते म्हणाले कि , २० व्या शतकातील भारत हा नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यानंतरची स्वप्न पूर्ण करण्याची त्यावेळी जबाबदारी होती. मात्र हे २१ शतक आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि लवकरच तो भारताचा भौगोलिक भाग असेल, असे यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही बोलले होते. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावेळी संसदेत चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही पाकव्याप्त काश्मीर भारताचेच आहे, असे म्हटले आहे. तिथले नागरिक आपले आहेत. आपण अजूनही जम्मू-काश्मीर विधानसभेतील २६ जागा राखून ठेवतो. पाकव्याप्त काश्मीरसाठी बलिदान देण्याचीही आमची तयारी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचाही समावेश होते, असे अमित शहा कलम ३७० रद्द करतेवेळी संसेदत म्हणाले होते.