Donald Trump India Tour : पहा ट्रम्प यांच्या खास मेजवानीची आणि राहण्याची शाही व्यवस्था….

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प हे आपल्या परिवारासह भारतात येत आहेत. त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील अहमदाबादपासून ते आग्र्यापर्यंतचा त्यांचा दौरा खास बनवण्यासाठी तयारीमध्ये कोणतीच कमतरता राहू नये याची खबरदारी घेतली जातेय. दिल्लीतील शानदार असलेल्या आयटीसी मौर्य हॉटेलचं प्रशासनही ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला यादगार बनवण्यासाठी जोरदार तयारी करतं आहे. जवळपास साडे चार हजार चौरस फुटांचा “ग्रँड प्रेसिडेन्शियल सूट ” सर्व तयारीने सज्ज आहे. तिथं असणाऱ्या प्रसिद्ध बुखारा रेस्टॉरंटमध्ये खास ‘ट्रम्प थाळी’ बनवली जाणार आहे.
हॉटेलमध्ये ट्रम्प यांचं असं होईल स्वागत – दिल्लीतील आयटीसी मौर्या हे हॉटेल परदेशातून येणाऱ्या प्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तींची पहिली पसंती असते. आता अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनार्ड ट्रम्प यांच्या खातरदारीची जबाबदारीही याच हॉटेलला मिळाली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश केल्याबरोबर सुंदर अशा रांगोळीसोबत भारतीय वेषभूषा केलेल्या महिला ट्रम्प यांचं स्वागत करतील. राजस्थानच्या अरूण ग्रुपने पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या भारत दौऱ्या दरम्यान त्यांच्या जेवणासाठी खास विशेष लक्झरी सोन्या-चांदीच्या कटलरी आणि टेबलवेयर तयार केले आहेत. ही सर्व भांडी राजस्थानच्या अरूण ग्रुपने जयपूरमध्ये तयार केली आहेत. अरूण ग्रुपने याआधीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यामध्ये अशाच प्रकारची सोन्या-चांदीची भांडी तयार करण्यात आली होती.
या लॉबीमध्ये स्वागत झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प थेट १४ व्या मजल्यावर बनवलेल्या “ग्रँड प्रेसिडेन्शियल फ्लोर” वर पोहोचतील. तिथल्या चाणक्या सुटमध्ये राहण्याची खास सोय करण्यात आली आहे. या सुटमध्ये प्रायव्हेट प्रवेशद्वार आहे आणि प्रायव्हेट हाय स्पीड एलिवेटर सुद्धा आहे. एका रात्रीचं भाडं आहे इतकं – या “ग्रँड प्रेसिडेन्शियल फ्लोर” वर ४८०० चौरस फुटांमध्ये चाणक्य सूट तयार करण्यात आला आहे. एका रात्रीसाठी तब्बल ८ लाख रुपयांचं भाडं यासाठी मोजावं लागणार आहे. या सूटमध्ये २ बेडरूम आहेत. तर आलिशान लिव्हिंग रुम आणि सिल्क पॅनेलवाल्या भितीं, डार्क वूडवाल्या फ्लिरिंगसुद्धा इथे आहेत. पिकॉक थीमवर १२ सीटर प्रायव्हेट डायनिंग रुम, आधुनिक स्पा आणि जिमसुद्धा इथं आहे. प्रदूषणाच्या बाबतीतही मोठी काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी लॉबीमध्ये एक खास डायनामिक प्लाक लावण्यात आला आहे. प्रत्येक्ष क्षणाक्षणासंबधी प्रदूषणाची माहिती देतो आहे.
ट्रम्प यांच्या जेवणासाठी “ट्रंप थाळी” ची विशेष स्थापना करण्यात आली आहे. आईटीसी मौर्य च्या ” बुखारा ” मध्ये जेवणाची खास तयारी चालू आहे. गेल्या ४१ वर्षांपासून आलेल्या विदेशी पाहुण्यांची व्यवस्था याच बुखाराने केली आहे. वास्तविक त्यांच्या मेन्यू मध्ये काय काय असेल ? याची पूर्ण माहिती देण्यात आलेली नसली तरी ओबामा , बिल क्लिंटन प्रमाणे तंदूरी झींगा, मछली टिक्का, चिकन बोटी बुखारा आणि कबाब यांचा समावेश राहील.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच हिरे, रत्न आणि मोत्यांमध्ये देश आणि जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजस्थानलाही ट्रम्प भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामध्ये राजस्थानची महत्वाची भूमिका बजावणार आहे. राजस्थानच्या अरूण ग्रुपने पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या भारत दौऱ्या दरम्यान त्यांच्या जेवणासाठी खास विशेष लक्झरी सोन्या-चांदीच्या कटलरी आणि टेबलवेयर तयार केले आहेत.
अतिथी देवो भवः या परंपरेला सांभाळत असताना देशी-विदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करत असताना राजस्थानची प्रसिद्ध संस्कृती ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातही राजस्थानची संस्कृती आपली छाप पाडणार आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात त्यांच्या जेवण आणि ब्रेकफास्टसाठी विशेष भांडी तयार करण्यात आली आहेत. आणि ती चक्क सोन्याचांदीचा आहेत. ही सर्व भांडी राजस्थानच्या अरूण ग्रुपने जयपूरमध्ये तयार केली आहेत. अरूण ग्रुपने याआधीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यामध्ये अशाच प्रकारची सोन्या-चांदीची भांडी तयार करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या सोनं आणि चांदीच्या प्लेट्स, कटलरी सेट आणि टेबलवेयर दिल्लीमध्ये ट्रम्प यांच्या लंच आणि डिनरमध्ये पाहायला मिळतील. अरुण ग्रुपने असा दावा केला आहे की, याच्या आधी अमेरिकेचे माजी राध्यध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात सुद्धा त्यांनी विशेष कटरी आणि टेबलवेयर तयार केले होते. अरुण ग्रुपने आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या ट्रॉफी निर्मितीसह अनेक चांगल्या उत्पादनांच्या जोरावर जगभरात आपली ओळख बनवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा उद्या सुरु होत असून ट्रम्प यांच्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच हिरे, रत्न आणि मोत्यांमध्ये देश आणि जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजस्थानलाही ट्रम्प भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामध्ये राजस्थानची महत्वाची भूमिका बजावणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दौऱ्यात ट्रम्प ताज महालला भेट देणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात सुरक्षेच्या बाबतीत मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यात पोलीस कडक व्यवस्था तैनात करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ६००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबतच विमानतळापासून ते ताजमहालपासून पाच विभाग बनवले जातील. ट्रम्प यांच्या आगमनाबरोबर मोबाईल जॅमर लाऊन विमानतळापासून ते ताजगंज भागापर्यंत संपूर्ण मोबाईल बंद केले जातील. या संपूर्ण भागात म्हणजे जवळपास १५ किमी अंतरावरील संपूर्ण मोबाईल नेटवर्क बंद करण्यात येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रा दौरा झाल्यानंतर त्यांनी ताजमहालला भेट देऊन ते तिथून निघाल्यानंतर मोबाईलचे सर्व सिग्नल सुरू केले जातील. ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास १०८ संवेदनसील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय १५ उंच घरांच्या छप्परांवर पहारा करत पोलीस निरिक्षण करणार आहेत. विमानतळापासून ते ताजमहालपर्यंत जवळपास १५० छोटेमोठे रस्ते आहेत. तर १९ चौक आहेत. या सगळ्या ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे १० ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस या सगळ्यावर नजर ठेवणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प च्या २४ फेब्रुवारीला होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विमानतळ आणि आसपासच्या परिसराती प्रत्येक घरांमध्ये जाऊन माहिती घेत आहेत. हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांचीही माहिती घेतली जात आहे. परिसरात राहणाऱ्या भाडेकरूंचीही पूर्ण माहिती पोलिसांकडून जमा केली जात आहे. जगातील सर्वात बलवान राष्ट्राध्यक्षाच्या दौऱ्याच्या सुरक्षेला घेऊन खबरदारी घेण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम कामाला लागल्या आहेत. एकीकडे प्रसासन ट्रम्प यांच्या आगमनाच्या तयारीला लागलं असताना दुसरीकडे पोलिसांचं लक्ष मात्र सुरक्षेवर आहे. सुरक्षेच्या आढाव्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अनेक बैठकाही पार पडल्या आहेत. ताजनगरी आग्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं आगमन होण्याच्या एक दिवस आधी संपूर्ण ताफ्याचा अभ्यास केला जाणार आहे. तापा जाऊन परत येण्यापर्यंतचा खेरिया विमानतळापर्यंत १५ किमी रस्त्यावर वाहनांना थांबवण्यात येणार आहे.