Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : डॉक्टरच्या खुर्चीत मनोरुग्ण बसला आणि पुढे जे काय झाले ते तुम्हीच पहा….

Spread the love

मध्य प्रदेशातील छतरपूर भागात एका  रुग्णालयात डॉक्टरांच्या रिकाम्या खुर्चीवर बसून एका मनोरुग्णावर थेट खऱ्या खुऱ्या डॉक्टरांसारखं रुग्णांना तपासलं आणि औषधांचे प्रिस्क्रिप्शनही दिले. रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणाने  उघडकीस आणला तेंव्हा ही घटना समोर आली. विशेष म्हणजे रुग्णालयात सगळेजण डॉक्टरांची वाट पाहात पाहत असताना हा मनोरुग्ण थेट डॉक्टरांच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि डॉक्टर असल्यासारखं वागू लागला. त्यामुळे रुग्णांनाही हेच डॉक्टर असल्याचे  वाटले  आणि तपासण्यासाठी प्रत्येक रुग्ण एकेक करून आत जाऊ लागला. रुग्ण येत होते तसा हा मनोरुग्ण असणारा व्यक्ती त्यांना तपासत होता. त्याने अर्ध्याहून अधिक लोकांना टेस्ट करून औषधांच्या चिट्ठ्याही दिल्या.

दरम्यान लाल रंगाच्या पेनानं लिहिलेला कागद घेऊन हे सगळे रुग्ण जवळ असलेल्या मेडिकलमध्ये गेले. तिथे मेडिकलमध्ये काम करणाऱ्या तरुणाला हस्ताक्षरात गडबड वाटली आणि त्याने सर्व रुग्णांच्या चिठ्ठ्य़ा पाहिल्या. हा नेमका काय प्रकार आहे काही तरी गडबड आहे हे त्याच्या ध्यानात आलं आणि त्याने रुग्णालयात जावून चौकशी केली. औषधांची चिठ्ठी देणारे  डॉक्टर कुठे आहेत  ? अशी विचारणा केली असता २० नंबरच्या खोली क्रमांकामध्ये डॉक्टर नसून अज्ञात व्यक्ती असल्याचे  लक्षात आले. तेंव्हा तातडीने रुग्णालयातील अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन चौकशी करण्यात आली तेव्हा हि अज्ञात व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. अशापद्धतीची घटना कशी घडू शकते? रुग्णांच्या जीवासोबत खेळ आहे अशा संतप्त प्रतिक्रिय़ाही काही रुग्णांमधून उमेटल्या.

दरम्यान रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी या मनोरुग्णाला डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर काढलं आणि वातावरण शांत करण्यात आले आणि रुग्णांनाही त्या गोळ्या घेऊ नयेत आणि रुग्णालय आणि आसपासच्या मेडिकल परिसरातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. या मनोरुग्णाला संपूर्ण प्रकार काय आहे ? असे विचारले असता , त्याने सांगितले कि , डॉक्टर आले नसल्याने रुग्ण ताटकळत थांबले होते आणि मी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टर असल्याने मी खुर्चीत बसलो. शिवाय मी दिलेली औषधही बरोबर असल्याचाही दावा त्याने केला आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून या मनोरुग्णाची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी छतरपूर परिसरातील सर्व रुग्णालयांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!