Aurangabad Crime : शिवजयंती मिरवणूकीला गालबोट, तरुणाचा भोसकून खून , हल्लेखोर पसार

औरंगाबाद – शिवजयंती मिरवणूकीमधे न्यायनगर गारखेडा भागात अज्ञात इसमाने महाविद्यालयीन तरुणाचा छातीमधे चाकू भोसकून बुधवारी रात्री ८ च्या सुमारास खून केला.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीकांत गोपीचंद शिंदे (२२) असे मयताचे नाव आहे. श्रीकांतवर हल्ला झाल्याचे समजताच त्याचे वडिल गोपीचंद शिंदे यांनी श्रीकांतला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.पण डाॅक्टरांना श्रीकांत चे प्राण वाचवण्यात यश आले नाही. दरम्यान एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत मयताशी भांडण झाल्याचे कोणी साक्षीदार आहेत का हे तपासले. मयताचा भाऊ सूरज शिंदे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपी पकडले गेले नाहीत पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे करंत आहेत.