जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांचे निधन

पुण्यातील चिंतन ग्रुपचे संस्थापक, जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (वय ६५) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. अभिनंदन थोरात यांच्यामागे पत्नी कांचन, मंदार व चिंतन ही दोन मुले, स्नुषा, नात व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव उद्या दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. थोरात यांनी डिजिटल वाट चोखाळत अनेक अभिनव प्रयोग केले होते. मराठी एसएमएस न्यूज सर्व्हिस व रोजच्या वाढदिवसांची यादी थोरात यांनी सुरू केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.