Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सतत जमीन नावावर करून देण्याची मागणी करणाऱ्या मुलाची बापानेच दिली सुपारी , १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Advertisements
Advertisements
Spread the love

सोलापूरमध्ये बापाने पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे. २९ जानेवारीला एका तरुणाचा मृतदेह कुभारी गावाजवळ सापडला होता. या तरुणाची पित्याकडूनच  सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, १८ दिवसांआधी कुंभारी गावाजवळ एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. स्थानिकांनी तरुणाला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण पोलिसांना हत्येचा संशय आला. कारण, मुलाच्या गळ्यावर मारल्याच्या खुणा होत्या. यावरून पोलिसांनी पुढील तपास केला आणि संशयाची सुई मृत तरुणाच्या वडिलांवर येऊन थांबली. या तपासात वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचे उघड होताच पित्याला पोलिसांनी अटक केली.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुण घरात रोज त्रास द्यायचा. जमिन नावावर करण्यासाठी तो रोज वडिलांशी भांडायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी शेताच्या शेजारी राहणाऱ्या मित्रांना सांगून मुलाला कायमचं संपवण्याची सुपारी दिली. २ लाखांची सुपारी दिली असल्याची कबुली आरोपी वडिलांनी पोलिसांसमोर दिली आहे. शंकर वर्जे, राहुल राठोड, संजय राठोड अशा तिघांनी सुपारी दिली होती.

Advertisements
Advertisements

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा शोध लावत आरोपी पिता आणि इतर तिघांना ताब्यात घेतलं असून १७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, ज्या वडिलांनी मुलाला अखेरचा अग्नी दिला त्याच पित्याने मुलाची सुपारी दिली होती. या घटनेचा उलगडा झाल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हि बातमी पण वाचा

मुलीनेच आपल्या बापाचा काटा काढण्याचे वचन प्रियकराकडून घेतले आणि त्याने सुपारी देऊन केला खून , तब्बल पाच महिन्यांनी घटना झाली उघड !!

आपलं सरकार

Click to listen highlighted text!