Aurangabad Crime : धक्कादायक : पत्नीवर वार करून , मृतदेहाजवळ चिमुकल्याला बसवून पती झाला पसार !!

औरंगाबादमध्ये पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाजवळ अडीच वर्षाच्या मुलाला बसवून पती पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाजवळ त्यांच्या लहान मुलाला बसविले आणि फरार झाला. या घटनेमुळे सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरुणोदय कॉलनीत आणि देवळाई परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.या प्रकरणी मयत विवाहित जयश्री तांगडे हिचे वडील बाबासाहेब तांगडे , ४४ रा. रोहिना खुर्द , ता . परतूर , जि . जालना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीने हातोडा, धारधार लोखंडी हुकने पत्नीवर अनेक वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर तिला त्याच अवस्थेत मुलासह सोडून फरार झाला. जयश्री राम काळे , २६ असे मृत महिलेचे नाव आहे. तर राम बाबूराव काळे असे आरोपी पतीचे नाव आहे. औरंगाबाद शहराच्या सातारा परिसरातील अरुणोदय कॉलोनीत हा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविवच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलीस फरार आरोपी पतीचा शोध घेत असून आईच्या मृतदेहाजवळ असलेल्या चिमुकल्याची काळजी घेत आहेत. दरम्यान, पतीने अशा प्रकारे पत्नीची निर्घृण हत्या का केली ? याचा पोलीस शोध घेत आहेत.
मयतेच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , तिचा विवाह वाकुळणी येथील राम बाबुराव काळे याच्याशी आठ वर्षांपूर्वी झाला होता . त्यांना दोन मुले आहेत. परंतु तो तिला नेहमीच दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत होती या त्रासाला कंटाळून ती देवळाई परिसरातील अरुणोदय कॉलनीत सत्तार नामक ठेकेदाराकडे दोन अडीच महिन्यापासून मजुरी करून आपला उदार निर्वाह करीत होती. दरम्यान चार पाच दिवसांपूर्वी मुलीने फोन करून सांगितले कि , तिचा नवरा तिच्याकडे आला असून ” मला सोडून का आली म्हणून सतत दारू पिऊन पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. ” त्यानंतर आज फोन आला कि , तुमच्या मुलीला तिच्या नवऱ्याने मारहाण केली असून ती घरात बेशुद्ध पडली आहे. आम्ही तिला पाहण्यासाठी आलो असताना हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे करीत आहेत.