Aurangabad Crime : रेकाॅर्डवरील घरफोड्या पुंडलिकनगर पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद – सिटीचौक पोलिस ठाण्यातील हिस्र्टीशिटर पुंडलिकनगर पोलिसांनी तीन गुन्ह्यात अटक केला असून त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
नामदेव बाबासाहेब वक्ते (५०) रा. गेवराई जि बीड असे या रेकाॅर्डवरील घरफोड्याचे नाव आहे.वक्ते याने ७ते १०फेब्रूवारी या काळात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दुकान फोडल्या व एक मोटरसायकल जप्त करंत अंदाजे १लाख रु.चा मुद्देमाल लंपास केला होता.एपीआय घन्नशाम सोनवणे यांना खबर्याने माहिती दिल्यानंतर गेवराईहून आरोपी वक्ते ला पोलिसांनी पकडून आणले.वरील कारवाईत पीएसआय प्रभाकर सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे यांनी सहभाग घेतला होता.