मुलीने पळून जाऊन विवाह केल्याने आई , वडील आणि भावाची आत्महत्या

गडचिरोलीतील आनंद नगरमध्ये मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना दुःखद घटना घडली. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहे. या तिघांनीही त्यांच्या घरामागे असलेल्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११.३० च्या सुमारास यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी मुलीने आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर या तिघांनीही आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने मुलीच्या आई-वडिलांनी आणि भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.