कोरोना व्हायरसची वॉर्निंग देणाऱ्या डॉक्टरचाच गेला बळी , चीन मध्ये २८ हजाराहून अधिक लोकांना व्हायरसची बाधा

जगभर चर्चेत असलेल्या कोरोना व्हायरमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण असून भारतासह जगभरातील डझनभर देशात कोरोना व्हायरस पसरला आहे. आत्तापर्यंत या व्हायरसनं ५६३ जणांचा जीव घेतला आहे तर २८ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. भारतातही कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडालीआहे. विशेष म्हणजे ज्या डॉक्टरने जगाला सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसच्या संभाव्य प्रकोपाबद्दल सावध केले होते त्यांचाच या व्हायरसने बाली घेतल्याचे वृत्त आहे. चीनी डॉक्टर ली वेनलियांग असे या डॉक्टरचे नाव आहे .
चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनेच ही माहीती दिली आहे. ३४ वर्षीय डॉ. ली वेनलियांग आणि इतर आठ जणांनी सर्वात आधी करोना सारखा भयानक विषाणू चीननमध्ये आला असून हा आजार जीवघेणा असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र, संपूर्ण चीनमध्ये पसरलेल्या या जीवघेण्या आजाराचे वेनलियांगही बळी ठरले आहेत. वेनलियांग यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आज उशिरा त्यांचं वुहान येथे निधन झालं. डिसेंबर २०१९मध्ये वुहान येथे करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याचा अहवालही वेनलियांग यांनी दिला होता. त्यांनी व्हिचॅटवरूनही त्यांच्या मेडिकल स्कूलच्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली होती. यावेळी त्यांनी या आजारापासून नातेवाईकांना सावध करण्याच्या सूचनाही त्यांनी त्यांच्या मित्रांना दिल्या होत्या. मात्र, काही तासांतच त्यांच्या मेसेजचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. त्यावेळी पोलिसांनी वेनलियांग यांच्यावर अफवा पसरविल्याचा आरोप ठेवला होता.
डॉक्टर ली वेनलियांग यांनीच गेल्या वर्षी ३० डिसेंबरला कोरोना व्हायरसबद्दल जगाला सावध केलं होतं. त्यांनी त्यांच्या मेडिकल स्कूलच्या ऑनलाईन एम्युमनी चैट ग्रुपवर हॉस्पिटलमध्ये सात पेशंट दाखल झालेत ज्यांना सार्ससारख्या रोगाची लक्षण आहेत. लीनं हेही सांगितलं की चीनमध्ये कोरोना व्हायरसची पाळमुळं ही खूप जुनी आहेत. २००३ मध्येही या व्हायरनं शेकडो लोकांचे जीव घेतले होते. स्थानिक प्रशासनाला त्यांनीच कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला होता. पण त्यांच्या इशारा इशारा कुणी गांभीर्यानं घेतला नाही. स्थानिक पोलिसांनी तर त्यांना फटकारलं. पण हळू हळू या व्हायरसचा चीनमध्ये प्रादुर्भाव झाला आणि गुरुवारी वुहानमध्ये डॉक्टर ली वेनलियांग यांनाच कोरोना व्हायरसने घेरले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान चीनने गुरुवारी स्पष्ट केकेले आहे की, चीनमध्ये राहाणाऱ्या १९ विदेशी नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे पण त्यांनी या नागरिकांच्या देशाचा उल्लेख केलेला नाही. चीनच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत ५६३ जणांचा मृत्यू झालाआहे. तर एकूण २८,०१८ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी एकाच दिवसात ७३ लोकांचा जीव गेला आहे. कोरोनाचा प्रकोप झालेल्या चीनमधील वुहान प्रांतातून भारतासह जगातील अनेक देशांनी आपल्या नागरिकांना बाहेर काढलं आहे. आत्तापर्यंत ६४७ भारतीयांना सरकारने बाहेर काढलं आहे तर मालदीवच्या सात नागरिकांना हवाई मार्गानं बाहेर काढण्यात यश आलं आहे. उर्वरित १० भारतीय तीव्र तापामुळे विमानात चढू शकले नाहीत.