अॅटलस कंपनीच्या मालकीण नताशा यांनी अखेर आत्महत्या का केली ?

अखेर अॅटलस या प्रसिद्ध सायकल कंपनीची मालकीण नताशा कपूर यांनी दृश्य स्वरूपात सगळ्या सुखसोयी असताना आत्महत्या का केली याचा उलगडा होत नसल्याने दिल्ली पोलीस चक्रवाले आहेत. दरम्यान अधिक तपासात नताशा यांनी आत्महत्येपूर्वी चार-पाच जणांना एसएमएस करून पैशाची मागणी केली होती, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. य सर्व प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अॅटलस कंपनीची मालकिण नताशा कपूर यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी ” मी स्वत:च्या नजरेतून पडल्याचं म्हटलं होतं. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये. मला जे करायला नको होतं. ते मी केलं. त्यामुळेच मीच माझ्या नजरेतून पडले, असे लिहिले आहे. त्यामुळे नताशा यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्या इतपत नेमकं कोणतं कृत्य केलं? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. नताशा यांनी या सुसाइड नोटमध्ये पती आणि कुटुंबावरचं प्रेमही व्यक्त केलं आहे. मी संजय कपूर, माझी मुलगी आणि मुलगा यांच्यावर मनसोक्त प्रेम करते, असेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान काल नवी दिल्लीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील त्यांच्या घरात नताशा यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. नताशा यांच्या मृतदेहावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. पोलिसांनी नताशा यांची सुसाइड नोट आणि त्यांचा फोन ताब्यात घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार नताशा यांनी मृत्यूपूर्वी चार-पाच जणांना एसएमएस करून पैसे मागितले होते. नताशा यांनी पैसे उधार दिले होते का? किंवा त्यांना पैशाची गरज होती का? याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे. शिवाय नताशा यांनी ज्या लोकांना एसएमएस केले होते, त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.