६० वर्षांची आई आणि ७ नातवंडांची आजी असलेली प्रेयसी आणि २२ वर्षाच्या प्रियकराची अनोखी प्रेमकथा….पोलिसही झाले हवालदिल !!

we are made for each other
उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यातल्या एका गावात घडलेली एक अनोखी लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे. या प्रेमकहाणीत प्रेयसीचे वय ६० वर्ष तर प्रियकराचे वय २२ वर्ष आहे . विशेष म्हणजे या आजीबाईचा ७ मुले, सात नातवंड आणि सुना आहेत. पण एका तरुणाच्या प्रेमात पडून या आजीबाई थेट घरातून पळून गेल्या. त्यांच्या पतीने आणि मुलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर त्या आपल्या प्रेमिकाबरोबर पोलीस ठाण्यात हजरही झाल्या. या प्रेमाच्या गोंधळामुळे कुणाविरोधात आणि काय तक्रार दाखल करायची याचा पोलिसांनाही काही काळ प्रश्न पडला होता.
उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यातल्या एका गावातली ही हि प्रेम कहाणी काही हिंदी वेबसाइटवर बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे. बायको घरातून बेपत्ता झाली आणि गावातील एक तरुणही गायब असल्याची खबर पोलीस ठाण्यात देण्यासाठी या विवाहितेचा पती आणि तिची मुले पोहोचली तेंच हि अनोखी प्रेमकहाणी प्रकाशात आली. दरम्यान या तक्रारीची खबर मिळताच तो युवकही आपल्या परिवारासह पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि आपलं या ६० वर्षांच्या महिलेवर आपलं खरंखुरं प्रेम असल्याचं बिधास्तपणे सांगितलं. आम्ही लग्नही करणार असल्याचेही त्याने सांगितले. त्या स्त्रीच्या कुटुंबीयांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण दोघेही प्रेमी कुणाचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते.
विशेष म्हणजे प्रेम कथेतील या नायिकेला ७ मुले आहेत आणि त्यातल्या काहींची लग्नही झालेली आहेत. उतार वयात प्रेमात पडलेली ही स्त्री ७ नातवंडांची आज्जीसुद्धा आहे. पण जगजितसिंग यांच्या गझल प्रमाणे ” ना उम्र कि सीमा हो , ना जन्म का हो बंधन…” त्यांनी साक्षात आपल्या जीवनात उतरवली आहे. ही महिला या वयातही आपल्यापेक्षा तिपटीने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी तिने घरही सोडलं. पोलिसांसमोरच ही घटना उघड झाली. हे दोघे याअगोदरही न सांगता गायब झाल्याचेही यावेळी सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारे न सांगता घरातून निघून गेल्याबद्दल आणि आजूबाजूच्या परिसराची शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी अखेर त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यामुळे हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोहोचलं. त्यांची प्रेम कहाणी देशभरातील माध्यमांपर्यंत पोहोचली आहे.