Aurangabad Crime : ललिता ढगेंचा अपघाती मृत्यू, अज्ञात बसचालक मुकुंदवाडी पोलिसांनी पकडला.

औरंगाबाद – गेल्या शनिवारी १८ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वा.धूत हाॅस्पिटल समोर ललीता शंकर ढगे यांच्या स्कूटीला धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बसचालकाला मुकुंदवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या.
ढगे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात अज्ञात बस चालका विरुध्द गुन्हा दाखल होता. भारत वसंत निंगूरकर(६२) रा. एन ८शिवदत्त हाऊसिंग सोसायटी.असे अटक आरोपीचे नाव आहे.सी.सी. टि.व्ही. फुटेजवरुन बसचा शौध लागल्यानंतर संशयित म्हणून निंगूरकरला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.वरील कारवाई पोलिस निरीक्षक उध्दव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र बांगर आणि पीएसआय सुनिल चव्हाण यांनी पार पाडली