Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपने शिवसेनेनंतर आणखी एक मित्र पक्ष गमावला , एनआरसीच्या अंमलबजावणीवरून झाले मतभेद

Spread the love

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांनी सूत्रे हाती घेताच येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी उंचावण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आले आहे या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातली फुटीतून नड्डा यांना मार्ग काढावा लागणार आहे. महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षाची मैत्री सोडून शिवसेनेने भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी करून भाजपला दणका देऊन काही महिने उलटत नाहीत तोच आता भाजपचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलानेही  दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला साथ द्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये ८ फेब्रुवारीला निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि अकाली दल यांच्यातले मतभेद समोर आले.

केंद्र सरकारने एनआरसी  म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची अमलबजावणी करू नये, असं शिरोमणी अकाली दलाचं म्हणणं आहे.आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याचं स्वागत करतो पण या कायद्यातून एखाद्या धर्माच्या लोकांना वगळलं जावं, अशी मागणी आम्ही कधीच केली नव्हती, असं शिरोमणी अकाली दलाचे नेचे मजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितलं. सीएएमध्ये सगळ्या धर्माच्या लोकांचा समावेश व्हावा, असंही ते म्हणाले. भाजपच्या नेतृत्वाला आम्ही आमची भूमिका बदलावी, असं वाटत होतं. पण आम्ही भूमिका बदलण्याच्या ऐवजी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला हेही त्यांनी सांगितलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू यांची युती आहे. नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष दोन  जागांवर लढणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!