सफारी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी जखमी

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला असून या अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागून त्या जखमी झाल्या आहेत. या गाडीत जावेद अख्तर हे देखील होते मात्र त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. शबाना यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शबाना आणि जावेद अख्तर मुंबईहून पुण्याकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून जात असताना खालापूर टोल नाक्याजवळ त्यांची टाटा सफारी गाडी पुढे जणाऱ्या ट्रॅकवर जोरात आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.