Aurangabad Crime : चार घरफोड्यांचा तपास केला पूर्ण,३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तीन अटक

औरंगाबाद – उस्मानपुरा पोलिसांनी गुरुवारी चार घरफोड्यांचा तपास पूर्ण करंत ३ लाख४३ हजार ५००रु.चा मुद्देमाल जप्त केला.व तिघांना अटक केली.
शेख अफरोज गुलाब शैख(१९) त्याचा भाऊ शेख मजहर शेख गुलाब व शेख अली शेख सत्तार पठाण(२०) सर्व रा.काबरानगर या तिघांमा संशयावरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता वरील चोरट्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन व उस्मानपुरा पोलास ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. वरील चोरट्यांनी ३ लाख ४३ हजार ५०० रु.चे सोन्याचांदीचे चोरी केलेले दागिने पोलिसांच्या हवाली केले.
वरील कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके, पोलिस कर्मचारी प्रल्हाद ठोंबरे, दिपक कोळी, सतीश जाधव, संतोष शिरसाठ यांनी पार पाडली.