राहून गेलेली एक बातमी : रात्रीची गस्त घालणारे पोलीस , ऑटोमध्ये वासराला घेऊन फिरणारा रिक्षा चालक आणि एका गायीची गोष्ट …

good news, hands holding paper with text concept, positive media
मानवता इतिहास जमा होत चाललेल्या या युगात एखादी अशी घटना घडून जाते कि , जगात कुठे तरी अद्याप माणसांच्या मनात सर्व प्राणी मात्रांविषयी मैत्रीभाव जागृत असल्याचे दिसून येते याचीच प्रचिती औरंगाबाद शहरात घडली . त्याचे असे झाले कि , दि.४ जानेवारीच्या मध्य रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास वाजता सिडको पोलिसांची गस्त चालू असताना सिडकोच्या सिध्दार्थ चौक येथे साधारणतः ७-८ दिवस वयाचे एका गाईचे वासरू ४ कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. पोलीस चालक म्हसके यांच्या नजरेत हि बाब येताच त्यांनी गाडी थांबवून वासराची सुटका केली तेंव्हा लक्षात आले कि त्या वासराच्या जवळपास एकही गाय नव्हती .
पोलिसांना आता प्रश्न पडला कि , त्या वासराचे करायचे काय ? त्याला आहे त्या ठिकाणीच सोडून दिले तर पुन्हा मोकाट कुत्र्यांची भीती . तितक्यात एक ऑटो रिक्षा त्या ठिकाणी आला .राजू सुरसे असे त्याचे नाव आणि ऑटो रिक्षा क्रमांक MH20 DC 3775 . हि नोंद यासाठी कि याच ऑटो रिक्षा चालकाच्या हवाली पोलिसांनी त्या वासराला त्याच्या आईचा म्हणजे गाईचा शोध घेण्यासाठी सुपूर्द केले . पोलिसांची आज्ञा मानून त्यानेही त्या वासराला आपला ऑटो रिक्षात घेतले त्याच्या अंगावर चादर टाकली आणि रिक्षाचालक राजुने आपला रात्रीचा धंदा सोडून रात्रभर त्याच्या आईचा म्हणजे गायीचा शोध घेण्यास प्रारंभ केला परंतु रात्रभर फिरूनही परिसरात अशी एकही गाय त्याला दिसली नाही त्यामुळे शेवटी सकाळी त्याने वासराला आपल्या घरी नेले. परंतु काहीही न खाता पिता वासराचे केविलवाणे डोळे केवळ त्याच्या आईला शोधात होते. इकडे गाय सापडली नाही म्हणून रिक्षा चालक राजुही अस्वस्थ झाला आणि त्याने पुन्हा गायीचा शोध सुरु केला. अखेर दुपारी २ वाजता वासराच्या शोधात असणारी गाय त्याला सापडली तेंव्हा विसरणे न सांगतच गायींकडे धाव घेतली आणि गे -वासराचे प्रेम सुरु झाले.
हि बातमी राजू सुरासे याने पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा पाटील , पोलीस चालक योगेश म्हस्के , केशव कासारे यांना दिली तेंव्हा सर्वांनाच आनंद झाला . विशेष म्हणजे ऑटो रिक्षाचालक राजू सुरासे, रा. एन. ११ याने कुठलाही मोबदला न घेता हि सेवा केली त्याबद्दल सिडको पोलिसांनी त्याचे अभिनन्दन केले आहे.