ह्रदयद्रावक : एकाच कुटूंबातील पाच जणांची निर्दयी हत्या , लहान बालकांनाही त्यांनी सोडले नाही…

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज (अलाहाबाद ) येथील युसूफपूर गावातील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून तसंच दोन लहान मुलांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , विजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (३२) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. तर त्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (२८) आणि दोन लहान मुलं कान्हा (६) और कुंज (३) हे होते. सोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे तो सकाळी लवकर उठून कामाला जात असे. मात्र त्या दिवशी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी विजयशंकर तिवारी यांची वहिनी तिवारी यांच्या घरी गेली. मात्र त्या महिलेला समोर थेट रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले ५ मृतदेहच पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक घटना बघून ती महिला जोरात किंचाळली. हे विदारक दृश्य पाहून हि महिला धावत आपल्या घरी गेली आणि घरच्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस त्या घरात गेले तेव्हा दुसऱ्या खोलीत कामिनी आणि तिच्या लहान मुलाचाही मृतदेह मिळाला. त्यानंतर आतल्या खोलीत विजयशंकर तिवारी यांचीही हत्या करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंबालाच अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं होतं. घटनास्थळी पोलिसांना कुऱ्हाड मिळाली.
पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले मात्र मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे दूरचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अखेर सर्व नातेवाईक आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेनं प्रयागराजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिवारी कुटुंबातील ५ जणांची हत्या नेमकी कोणी केली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.