Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंतरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीच्या प्रियकराला विष पाजून खून

Spread the love

बीड जिल्ह्यात आंतरजातीय प्रेम प्रकऱणातून २५ वर्षीय तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपविल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. शेतात बोलावून प्रियकराला विष पाजलं. त्यानंतर उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. जिजाबा गंगाराम कुलाळ असं मयत तरुणांचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार जिजाबाचे आई-वडील ऊसतोडनीला कोल्हापूरला गेले असताना त्याला गावाकडे बोलावून मारहान करत विष पाजल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मयताच्या अंगावर मारहाण  केल्याचे वळ असल्याची  माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. विष पाजल्यानंतर जिजाबा याला तात्काळ जिल्हा रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं अखेर त्याचा आज मृत्यू झाला आहे. विष पाजून खून केल्याचा मयताच्या आई वडिलांसह नातेवाईकांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातील धूमेगावातील घटना आहे. आरोपींना अटक करण्यासाठी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ३ तास ठिय्या आंदोलन केलं. आरोपीला अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेण्यासही नकार दिला आहे.

या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून जिजाबाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलीस नातेवाईकांची शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण अशा प्रकार तरुण मुलाला गमावल्यामुळे संपूर्ण कुलाळ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!