मातोश्रीवर अडवलेल्या त्या शेतकऱ्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांचीही प्रतिक्रिया….

मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आपल्या मुलीसह आलेल्या शेतकऱ्यांसोबत पोलिसांनी केलेल्या वर्तनावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना भेटलं पाहिजे, असं ते म्हणाले. ‘शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलीच पाहिजे,’ असं म्हणत नवनिर्वाचित मंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
बच्चू कडू पुढे म्हणाले कि , ‘प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे. असा काळ आला तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसणार आहे,’ त्यांना मिळालेल्या खात्याबद्दल बोलताना ते म्हणाले कि , ‘खातं कुठलंही असो, मी त्याासाठी मागणी केली नव्हती. मात्र सामाजिक न्याय मिळालं असतं तर अपंग बांधवांना न्याय देता आला असता. सामाजिक न्याय खात्याची तशी मागणी कोण करत नाही. मात्र आम्ही ते मागितले होते, त्यामाध्यमातून अपंगांचे प्रश्न मार्गी लागले असते’.