Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बसस्थानकातून पाकीटमारांनी ७२ हजार रूपये लांबविले

Advertisements
Advertisements
Spread the love

मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या काही महिन्यापासून पाकीटमारांनी धुमाकुळ घातला आहे. शनिवारी सायंकाळी चोरट्यांनी औरंगाबाद ते यावल बसमधुन प्रवास करणार्‍या दोन प्रवाशांचे खिसे कापून ७२ हजार रूपये लंपास केले.
विजयकुमार बाबारावजी अडीकने (वय ४२, रा.गॅस गोडावूनच्या पाठीमागे, सिल्लोड) हे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आपले सासरे काशीनाथ गिरजाअप्पा देवकर यांच्यासोबत औरंगाबाद येथून सिल्लोडला जाण्यासाठी औरंगाबाद ते यावल या बसमध्ये बसले होते. विजयकुमार अडीकने बसमध्ये चढत असतांना चोरट्याने त्यांच्या डाव्या खिशातील रोख ३६ हजार रूपये आणि उजव्या खिशातील १ हजार रूपये, एसबीआय बॅकेचे एटीएम कार्ड,पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना असा एकूण ३७ हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. तसेच मुश्ताक खा गुणीखा पठाण (वय ५३, रा.वाकडी, ता.भोकरदन) यांच्या खिशातून चोरट्यांनी ३५ हजार रूपये लांबविले.
याप्रकरणी विजयकुमार अडीकने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाकीटमारांविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!