झारखंडच्या पराभवावरून शत्रुघन सिन्हा यांनी काढले मोदी -शहा यांना चिमटे

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव लक्षात घेता , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी टीका करताना म्हटले आहे कि , ‘वन मॅन शो आणि टू मेन आर्मी’, तुमचा खेळ संपला आहे, ‘खामोश, झारखंड बीजेपी…. टाटा, बाय-बाय!’, असेही आपल्या खास शैलीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावले आहे.
काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. खामोश, झारखंड बीजेपी… टाटा-बाबाय. वन मॅन शो आणि टू मेन आर्मी तुमचा खेळ संपला आहे. आता पुढे दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक ठिकाणांचा नंबर आहे, असे सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सिन्हा यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांचा पराभव करणारे सरयू राय यांची प्रशंसा केली आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून हेमत सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत आघाडीचे प्रमुख म्हणून हेमंत सोरेन हे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सत्ता स्थापनेच दावा करतील. तसेच, अनेक औपचारिकतांनंतर सोरेन सरकार स्थापन होईल. तर, दुसरीकडे रघुबर दास यांनी पराभव स्वीकारत आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.