शेतकऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय विकास महामंडळाचीही कर्जे माफ करावीत : रामदास आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांप्रमाणेच मागासवर्गीय विकास महामंडळांची कर्ज माफी करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करणार असल्याचाही इशाराही त्यांनी यावेळी दिला. नासुका आणि एनआरसीच्या विरोधात गैरसमजातून आंदोलन सुरू आहेत. हा कायदा मुस्लिम विरोधी नाही, त्यांना चिथवण्यात येत आहे. हे आंदोलन दूर्दैवी, मुस्लिमांनी शांतता राखावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
या षटकार परिषदेच्या वेळी पुण्यात विविध कार्यक्रमासाठी आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेच्या वेळी येऊन आठवले यांची भेट घेतली तेंव्हा सर्वच पत्रकार आश्चर्यचकित झाले. यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना काही प्रश्न विचारले पण तिन्ही आपण उद्या पत्रकार घेऊ असे बोलून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. दरम्यान आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कर्जमाफी केली पण पैसे कुठून आणणार, सातबारा कोरा का नाही केला, असा प्रश्नही उपस्थित केला.
रिपाईची कार्यकारिणीची पुण्यात रविवारी बैठक झाली. १ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ठ निश्चित करण्यात आले आहे. बैठकीनंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळं व्हावं, असा सल्ला देत मंत्रिमंडळ विस्तार कधी? असा सवाल ठाकरे सरकारला केला.
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही, पुणे पोलिसांची तत्कालीन कारवाई समर्थनीय असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. एल्गार प्रकरणी पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारावा, हिंसेने काहीही साध्य होत नाही. महामंडळ नियुक्त्या मध्येच बरखास्त करता येणार नाहीत, तसे केल्यास कोर्टात जाऊ, असा इशारा आठवलेंनी दिला आहे.