Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम बंगाल : आंदोलकांच्या कपड्यावरून चर्चा होत असतानाच , डोक्यावर जाळीदार टोपी आणि लुंगी घालून आंदोलनात उतरलेल्या भाजप कार्यकर्त्यांना अटक

Spread the love

https://epaper.telegraphindia.com/imageview_309141_16019600_4_undefined_20-12-2019_5_i_1_sf.html

देशभर नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या  विरोधातील आंदोलनाबरोबरच आंदोलकांच्या कपड्यांची भाजपकडून चर्चा केली जात असतानाच,  पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील राधामाधाबटला भागात भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्याच्या पाच साथीदारांसोबत अटक करण्यात आली आहे. टेलिग्राफमध्ये आलेल्या वृत्तानुसार, हे सर्वजण डोक्यावर गोल जाळीदार टोपी आणि लुंगी अशा वेशात होते आणि ट्रेनवर दगडफेक करत होते. स्थानिक लोकांनी त्यांना धावत्या ट्रेनवर दगडफेक करताना पाहिले  आणि पकडून पोलिसांच्या हवाली केले.

दरम्यान भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे मान्य केले की अभिषेक भाजपचा सदस्य आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष गौरी शंकर घोष यांनी मात्र  ‘ अभिषेक पक्ष सदस्य नसल्याचे सांगून राधामाधाबटला घटनेबद्दल आम्हाला काहीही माहित नाही.’ असे सांगितले.

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी या घटनेचा उल्लेख न करता असा आरोप केला होता की भाजप कार्यकर्त्यांसाठी जाळीदार टोप्या खरेदी करत आहे आणि दंगे करून विशिष्ट समाजाला बदनाम करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी असे म्हटले होते की,  सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आंदोलनकर्ते त्यांच्या कपड्यांवरून सहज ओळखू येतात.

याबाबत मुर्शिदाबादमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की राधामाधाबटला गावात गावकऱ्यांनी सहा तरुणांना सेल्दाह-लालगोला मार्गावर सेल्दाहवरून सुटणाऱ्या चाचणी इंजिनावर दगडफेक करताना रंगेहाथ पकडले. या सहापैकी एक अभिषेक सरकार (२१) हा स्थानिक भाजप कार्यकर्ता आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मुकेश म्हणाले, ‘तरुणांचा दावा आहे की त्यांनी लुंगी आणि टोपी व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी घातली होती. हा व्हिडिओ त्यांना आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करायचा होता. मात्र आम्हाला आतापर्यंत असा कुठलाही व्हिडिओ मिळालेला नाही.’

ताब्यात घेतलेल्या सहा लोकांची पोलिसांनी बहरमपूर ठाण्यात चौकशी केली. यामध्ये त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार पसार झाल्याचेही  सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!