Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे सुपूत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे होताहेत भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख

Spread the love

महाराष्ट्राचे सुपूत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. नरवणे यांचे वडील मुकुंद हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. मनोज यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

देशाचे नवीन लष्करप्रमुख निवडताना सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने केला आहे. त्यामुळे मराठी मुलुखातील मूळ पुण्याचे असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हेच आता देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील. आर्मीचे सध्याचे प्रमुख जनरल बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबरला निवृत्त होत असताना सध्या उपप्रमुख असलेल्या लेफ्टनंट जनरल नरवणे यांनाच यापदी बढती दिली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यापदावरील ते दुसरे मराठी अधिकारी असतील.

मुकुंद नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!