Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत बचाव रॅलीत राहुल गांधींबरोबर प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्याकडूनही मोदी सरकरवर घणाघाती टीका

Spread the love

राहुल गांधी , प्रियांका गांधींबरोबरच पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर मोठा हल्ला केला आहे . दिल्लीतल्या रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाओ रॅलीमध्ये त्यांनी ही टीका करताना ,  मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असा असल्याचे म्हटले आहे.  ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा मोदी सरकारने दिली होती. मात्र आज या मंचावरुन मी विचारते आहे की कुठे आहे सबका साथ सबका विकास? काही ठराविक लोकांचे खिसे भरले जात आहेत. जनतेचा, शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा या सरकारला पूर्णपणे विसर पडला आहे अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.

“काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत घेतला. मात्र आज मी विचारते कुठे आहे तो काळा पैसा? आज देशात बेराजगारी वाढली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. छोटे व्यावसायिक प्रचंड तोटा सहन करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशात भीतीचं वातावरण आहे. यालाच म्हणतात का अच्छे दिन? ” असा टोलाही सोनिया गांधी यांनी लगावला.

प्रियांका गांधी यांचीही घणाघाती टीका 

दिल्लीतील रामलीली मैदानात काँग्रेसकडून सरकारविरोधात भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बोलताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या कि , सध्या देशाची अवस्था बिकट बनलेली असतानाही प्रत्येक टीव्ही वाहिनीवर आणि वर्तमानपत्रात ‘मोदी है तो मुमकीन है’ अशा जाहिराती झळकत आहेत. या जाहिराती फसव्या असून या उलट देशातील परिस्थिती बनली आहे, अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

“देशात आता समानतेचा अधिकार राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था अशा वेगाने वाढत होती की चीनच्या बरोबरीने भारत वेगाने पुढे जाईल असे वाटत होते. मात्र, भाजपाच्या सहा वर्षांच्या सत्तेमुळे याला खीळ बसली आहे. रोजगार कमी झाला आहे. छोटे व्यापारी जीएसटीमुळे वैतागले आहेत, महागाई वाढत आहे. मात्र, तरीही प्रत्येक बस स्टॉपवर, टीव्हीवरील वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रात ‘मोदी है तो मुमकीन है’च्या जाहीराती झळकत आहे. या जाहिरातींच्या उलट परिस्थिती देशात असून भाजपा आहे म्हणून संविधानविरोधी कायदे तयार होत आहेत. भाजपा आहे म्हणून विकास दर घटला आहे, कांदा १०० रुपये किलो झाला आहे. भाजपा आहे म्हणून ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी शक्य झाली आहे, भाजपा आहे म्हणून ४ कोटी रोजगार नष्ट होणे शक्य झाले आहे. न्याय मिळणे हा कायद्याच्या राज्यात प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, भाजपा आहे म्हणून आज देशात चारही बाजूला अन्यायाचे वातावरण आहे. गरीबांना अडचणीत आणले जात आहे तर श्रीमंतांचे लाड केले जात आहेत.” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

जनतेला आवाहन करताना प्रियंका गांधी म्हणाल्या कि, “देशाच्या प्रत्येक नागरिकाला मी सांगू इच्छिते की, आपला आवाज उठवा, देशाचा आवाज बना. जर आज आपण आवाज उठवला नाही, गप्प बसलो तर आपल्या डोळ्यासमोर आपले क्रांतीकारक संविधान नष्ट होईल. त्यामुळे या गुन्ह्याला भाजपा जितकी जबाबदार आहे तितकेच आपणही असू. आज जर तुम्ही अन्यायाविरुद्ध लढला नाहीत तर भविष्यात तुमची भेकड म्हणून गणना होईल.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!