संस्कृत बोलल्याने डायबिटीज दूर होतो ,कॉलेस्टोरॉलचं प्रमाणही कमी होतं , भाजपच्या खासदारांचा शोध

Speaking #Sanskrit keeps diabetes, cholesterol at bay: BJP MP Ganesh Singh in Lok Sabha
— Press Trust of India (@PTI_News) December 12, 2019
भाजपचे खासदार गणेश सिंग यांनी एका चर्चे दरम्यान लोकसभेत संस्कृतचं महत्त्व सांगताना ते म्हणाले कि , संस्कृत बोलल्याने डायबिटीज दूर होतो. जे लोक ही भाषा बोलतात त्यांना डायबेटीज होत नाही. संस्कृत बोलल्यामुळे कॉलेस्टोरॉलचं प्रमाणही कमी होतं. आपलं हे अगाध ज्ञान सांगताना त्यांनी पुरावे मात्र कुठलेही दिले नाहीत. त्यामुळे सगळेच खासदार त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते.
केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनीही त्यांच्या आधी उत्क्रांतीवादाचा सध्याचा सिद्धांत हा चुकीचा असल्याचं सांगत नवीनच थेअरी मांडली होती. त्यामुळे देशभर वादळ निर्माण झाले होते . त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी अशाच प्रकारची वक्तव्य केल्याने अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.