Auragabad Crime : मानव तस्कराला बेड्या, विक्री केलेली महिला परत आणून तिची सुटका करण्यात पोलिसांना यश

औरंगाबाद – अडीच महिन्यांपूर्वी नौकरीचे अमीष दाखवून हनुमानगरातील दोन महिलांना मध्यप्रदेशात नेऊन विक्री करणार्या शिवाजी धनेधर च्या(४४) जवाहरनगर पोलिसांनी शनिवारी रात्री मुस्क्या आवळल्या तसेच त्याने विक्री केलेल्या एका महिलेची सुटकाही पोलिसांनी केली.
शिवाजी धनेधर हारमानगरात आल्याची माहिती खबर्याने जवाहरनगर पोलिसांना दिली होती. पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. भारत काचोळे, शशिकांत तावडे,संदीप जाधव, राजेंद्र शिंगाणे,कृष्णा बोर्हाडे, पांडुरंग तुपे , जमादार अकोले तपास करीत आहेत.