महाअॅग्रोच्या कृषी प्रदर्शनाचे ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज उद्घाटन , पाच एकरात केली स्टॉलची उभारणी

औरंंंगाबाद : मराठवाडा आणि राज्यातील शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि शेती पुरक उद्योग निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी महाअॅग्रोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि.२९) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या कृषी प्रदर्शनासाठी कृषी विज्ञान केद्रांच्या ५ एकर जागेत शेतीमालाची विक्री करण्यासाठी १०० स्टॉल उभारण्यात आले आहेत.
महाअॅग्रो औरंगाबादच्या वतीने राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता केव्हीके कृषी तंत्र विद्यालय, महानुभव आश्रमासमोर, पैठण रोड येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅडत्र देवयानी डोणगांवकर, महापौर नंदकुमार घोडेले, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, सिडकोचे प्रशासक मधुकरराजे आर्दड, एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, सी.एम.आय.ए.चे अध्यक्ष गिरीधर संगानेरिया, अपेडाचे संचालक रामचंद्र भोगले, एम.एस.सी.सी.आय.ए.चे उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सिआम चे अध्यक्ष अजित मुळे, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ.टी.एस.मोटे, साहेबराव दिवेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महाअॅग्रोच्या वतीने होणा-या कृषीप्रदर्शनाचा लाभ मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन महाअॅग्रो-२०१९ चे मुख्य समन्वयक अॅड. वसंत देशमुख, सीएमआयएचे मानद सचिव शिवप्रसाद जाजू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ.प्रदिप इंगोले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक प्रकाश अव्हाळे आदींनी केले आहे.