Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संरक्षण मंत्रालयाच्या समितीत शरद पवार , सुप्रिया सुळे यांच्यासह साध्वी प्रज्ञा यांची नियुक्ती

Spread the love

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची   संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करीत भोपाळमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी आहे. तसेच त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. भोपाळमध्ये भाजपच्या तिकीटावर उभ्या असलेल्या साध्वींनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा दारुण पराभव केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!