देवेंद्र फडणवीस यांनी “वर्षा ” बंगल्याबाबत घेतला हा निर्णय …

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर रिकामा करायचा होता. मात्र, त्यांना आणखी तीन महिने या बंगल्यात वास्तव्य करता येणार आहे. त्यांना वाढीव मुदत देण्यात आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी यासाठी अर्ज केला होता आणि तो मंजूर करण्यात आला.
दरम्यान राज्यात कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू शकला नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी या शिफारशीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू होताच काही माजी मंत्र्यांनी मलबारस्थित बंगले रिकामे करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितली आहे. तर मंत्रालयासमोरील बंगले रिकामे करण्याची काही मंत्र्यांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक जारी करून सर्व मंत्र्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मंत्रालयातील कार्यालये रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंत्र्यांनी एका दिवसाच्या आतच मंत्रालयातील आपापली कार्यालये रिकामी केली.
राज्यपालांच्या परवानगीनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यात आणखी तीन महिने राहता येणार आहे. एकीकडे शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना वर्ष बंगला वापरण्यास तीन महिने मुदत वाढ दिल्याने नवीन सरकार येण्यास तीन महिन्यांचा कालववधी लागणार आहे कि काय ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे . किंबहुना त्याच्या आत सरकार स्थापन झाले तर नव्या मुख्यमंत्र्यांसाठी फडणवीस यांना तात्काळ बंगला रिकामा करावा लागेल.