Aurangabad Crime : भामट्याने लावला डॉक्टरला २ लाखांचा चुना

औरंंंगाबाद : एसबीआय बँकेतून बोलत असल्याची थाप मारून भामट्याने डॉक्टरच्या खात्यातील २ लाख रूपये ऑनलाईनरित्या काढुन घेतले. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहम्मद अलीम अब्दुल रहीम (रा.कालाबावर, गौरक्षण रोड, परभणी) हे गेल्या महिन्यात १४ ऑक्टोबर रोजी काही कामानिमित्ताने औरंगाबादला आले होते. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास डॉ. मोहम्मद अलीम यांच्या मोबाईलवर भामट्याने ९१६२९४०६१०४६ या क्रमांकावरून फोन केला. आपण एसबीआय बँकेतून बोलत असून तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक द्या, नसता तुमचे पैसे आरबीआय बँक जप्त करणार असल्याची थाप मारली. त्यावेळी डॉ. मोहम्मद अलीम हे कामाच्या गडबडीत असल्याने त्यांनी आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला. त्यानंतर भामट्याने डॉ. मोहम्मद अलीम यांच्या बँक खात्यातून २ लाख रूपये ऑनलाईनरित्या काढुन घेतले.
हा प्रकार डॉ. मोहम्मद अलीम यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भामट्याविरूध्द परभणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी क्रांतीचौक पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक करीत आहेत.