क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, बाळासाहेब थोरात यांचा गडकरींना टोला

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर सध्या जोरदार टोलेबाजी सुरु आहे. ‘क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये बॉल दिसतो, पण भाजपला बॉल दिसलाच नाही’ असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लगावला आहे.
सत्तास्तापानेच्या नाट्यामधून भाजपा बाहेर पडली आहे असे वाटत असतांना ‘क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं’, असे वक्तव्य भाजप नेते नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले होते. क्रिकेटमध्ये अनेकवेळा आपला पराभव होईल असे वाटते पण अचानक चित्र पालटते आणि निकाल तुमच्या बाजूने लागतो. राजकारणाचेही तसेच आहे, असे गडकरी म्हणाले होते. या विधानामुळे अनेक चर्चांना उधान आले. आज बाळासाहेब थोरात यांनी गडकरींना प्रत्युत्तर दिले, ‘गडकरी आमचे मित्र आहेत. क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो राजकारणात तसे होतंच असं नाही.’ दरम्यान शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना खूप उशीरा भेटले, आम्ही आधीच भेटलो. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून विनंतीही केली आहे. तसेच राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागणार नही. मुक्यामंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आशिष शेलार यांनी महाशिवआघाडीवर राज्यात तीन अंकी नाटकाचा प्रयोग सुरु आहे अशी टीका केली होती. ‘त्यांना या तीन अंकी नाटकाचा शेवट माहित नही म्हणून ते बोलत आहे’ असा टोला बाळासाहेब थोरात यांनी आशिष शेलार यांना लगावला.