Aurangabad Crime : अट्टल दुचाकी चोर गजाआड तर जबरी चोरीतील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करणार्या रोहीत दत्तू अंभोरे (वय २०, रा.नालंदा शाळेजवळ, मुकुंदवाडी) याला मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी (दि.११) गजाआड केले. रोहीत अंभोरे याच्या ताब्यातून चोरीच्या ८० हजार रूपये किंमतीच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, सहाय्यक फौजदार कौतीक गोरे, जमादार वैâलास काकड, अस्लम शेख, सुनील पवार, मनोहर गिते, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, संतोष भानुसे, सुधाकर पाटील आदींच्या पथकाने मुकुंदवाडीतील झेंडा चौकात सापळा रचून रोहीत अंभोरे याच्या मुसक्या आवळल्या.
जबरी चोरीतील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
औरंंंगाबाद : जबरी चोरी प्रकरणातील आरोपी असलेल्या देवण तात्याजी काळे (रा.गणेशनगर, ता.राहता, जि.अहमदनगर) याला गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. देवण काळे याच्या ताब्यातून पोलिसांनी जबरी चोरीतील ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे,पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर, जमादार श्रीराम राठोड, माधव चौरे, विकास माताडे, अश्विन होनराव, विकास भानुसे, नितीन देशमुख, रेखा चांदे, आयझॅक कांबळे आदींच्या पथकाने देवण काळे याला अटक केली. दरम्यान, देवण काळे याच्याजवळ सापडलेल्या मोबाईलमध्ये राहुल दिलीप पिंपळे (रा.गणेशनगर, ता.राहता, जि.अहमदनगर) यांच्या नावाचे सिमकार्ड पोलिसांना मिळून आले.