Aurangabad Crime : बलात्काराच्या दोन गुन्ह्यात, सावत्र बापासहित एक अटक

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून औरंगाबाद शहरातील जवाहरनगर आणि हर्सूल पोलिस ठाण्यात दोघांना अटक करण्यात आली आहे.
जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बापानेच सावत्र मुलीचे दोन महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपी रिक्षा चालक आहे. त्यालााअटक करण्यात आली आहे. तर दुसर्या घटनेत हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्केटिंग करणार्या तरुणाने घरासमोर राहणार्या अल्पवयीन मुलीवर सोमवारी सकाळी बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.आरोपी रामराव आश्रूबा साबळे(१९) रा.जामंद ता.शेणगाव जि. हिंगोली. हल्ली मु. रमाई हौसिंग सोसायटी.याला हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे. वरील दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नरैंद्र जाधव आणि सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर आणि हर्सूल पोलिस करंत आहेत.