चर्चेतल्या बातम्या : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, कुणाचे सरकार बनवायचे ते लवकर ठरवावे . सर्व पर्याय खुले असल्याचा पुनरुच्चार

- खरी बोलणारी लोक हवी की खोटं बोलणारी लोकं हवीत याचा जनतेने विचार करावा
- खोटं बोलणारी माणसे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्यातेत बसतात; उद्धव यांचा संघाला सवाल
- फडणवीस यांनी सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटंल, त्यांनी सरकार स्थापन करावं; मग, आम्ही आमचा पर्याय सांगू
- मी कधीही सत्ता स्थापनेचा दावा केला नाही.
- महायुती हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला.
- अमित शहा आणि कंपनीने कितीही खोटारडेपणाचे आरोप केले तरी जनतेला खोटारडेपणा कोण करतो माहित आहे
- राम मंदिराचा निकाल हा न्यायलयाकडून आलेला निकाल, सरकारचा काहीही संबंध नाही
- माझ्याकडून चर्चेचे दरवाजे अद्यापही उघडे
- कुणाचे सरकार बनवायचे ते लवकर ठरवावे . सर्व पर्याय खुले असल्याचा पुनरुच्चार.
- युती माझ्याकडून तुटलेली नाही . चर्चेचे दरवाजे माझ्याकडून बंद नाहीत . दरवाजे यासाठी बंद केले कि , मला खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला म्हणून मला तसे वागावे लागले.
- होय , मी फोनवर बोललो नाही , माझ्या ठाकरे घराण्याच्या परंपरेचे मी न बोलून पालन केले.
- सत्तेची लालसा इतक्या खोटेपणाला जाते हे पहिल्यांदा कळलं.
- आर एस एस विषयी आदर .
- चुकीच्या लोकांसोबत गेलो याचे वाईट वाटते.
- गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न; उद्धव यांची भाजपवर टीका
- ज्यांनी टीका केली त्यांच्याशी मैत्री करता ? चौटाला यांचे कात्रण पत्रकारांना दिले .
- मी मोदीजींवर कधीही टीका केली नाही .
- भाजपच्या अडचणी मी समजून घेतल्या हा काय माझा गुन्हा आहे ?
- मी अजूनही भाजपला मित्रपक्ष मानतो . देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत .
- अमित शहा , देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सगळं थराला होतं . आता ते बदलले ठीक आहे .
- खोटे कोण बोलतोय हे महाराष्ट्र जाणतोय . शिवसेनाप्रमुखांच्या मुलावर खोटारडेपणाचा आरोप . हि माझी ओळख मी ठेवणार नाही .
- उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु .
विधानसभा निवडणुकीचे लागल्यानंतर इतक्या दिवसात सरकार स्थापन का होऊ शकले नाही ? त्यामागे काय कारणे होती? ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु होत आहे.
५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला नव्हता. उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यामध्ये सुद्धा असा काही निर्णय झाला नव्हता हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला होता असे म्हटले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय बोलणार? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. मी स्वत: मातोश्रीवर फोन केले पण उद्धव ठाकरेंनी ते फोन उचलले नाहीत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.