शिवसेना-भाजपच्या ५०-५० फॉर्म्युल्याची खा . ओवैसींनी उडविली खिल्ली , म्हणाले हे कुठलं नवं बिस्कीट ?

A Owaisi:What is this 50-50,is this a new biscuit?How much 50-50 will you do?Save something for Maharashtra's public.They (BJP&Shiv Sena) are not bothered about the destruction rain has caused in Satara. All they talk about is 50-50.What kind of 'Sabka Sath Sabka Vikas' is this? pic.twitter.com/Ct4DFRLnDp
— ANI (@ANI) November 3, 2019
शिवसेना-भाजपमध्ये सत्तेच्या वाटपावरून संघर्ष सुरूच असून शिवसेना ५०-५० टक्केवारी ठाम आहे. या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी खिल्ली उडवली आहे. ‘हे फिफ्टी-फिफ्टी काय आहे? कुठलं नवं बिस्कीट आहे का?’ असा प्रश्न ओवेसींनी विचारला आहे.
या वादावर आपली प्रतिक्रिया देताना ओवेसींनी म्हटले आहे कि , भाजप-शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्ष टीपेला पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ अडीच-अडीच वर्षे शिवसेना आणि भाजपच्या गळ्यात पडायला हवी, असा हट्ट शिवसेना धरून बसलीय. दुसरीकडे, असा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला नव्हता, असं भाजपचं म्हणणं आहे. ओवेसी म्हणाले, ‘भाजप-शिवसेनेला राज्याच्या जनतेशी काही देणंघेणं नाही. साताऱ्यात पावसाने हाहाकार उडवला आहे, पण त्यावर यांनी काही केलं नाही. यांना फक्त फिफ्टी-फिफ्टीची पडली आहे. हा कुठल्या प्रकारचा ‘सबका साथ सबका विकास’ आहे?’