महाराष्ट्राचे राजकारण : शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू

अखेर शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यानंतर शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. याबरोबरच सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार राज्यपालांची भेट घेणार आहे.
शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत असल्याने प्रारंभी शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होणार असल्याचे सांगितले जात होते . मात्र, कालपासून या पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती आणि अखेर आज शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली .