जम्मू -काश्मीर आणि लद्दाखची नव्या भविष्याच्या दिशेने वाटचाल, पाकिस्तान तोंडघशी पडला : एकता दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

Prime Minister Narendra Modi in Kevadia: Azaadi ke baad, pehli baar J&K mein BDC ke chunaav huye pichle hafte, aur 98% panch aur sarpancho ne vote daala. Yeh bhaagidaari apne aap mein ekta ka sandesh hai. Ab J&K mein ek rajneetik sthirta aayegi. #Gujarat pic.twitter.com/Xq7dYCx0BT
— ANI (@ANI) October 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनाला सरदार पटेल यांना आदरांजली वाहताना कलम ३७०चा उल्लेख करत पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे . आमच्याशी युद्धात जिंकू शकत नसल्याने ते आता आमच्या एकतेला आव्हान देत आहेत. अशा शक्तिंना हाणून पाडणारा एक मोठा निर्णय आम्ही काही आठवड्यांपूर्वी घेतला. कलम ३७०ने जम्मू-काश्मीरला फुटीरतावाद आणि दहशतवादाशिवाय काहीच दिलं नाही, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले कि , देशात फक्त जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू होतं. यामुळे तिथे गेल्या तीन दशकांपासून दशतवादी कारवाया सुरू होत्या. यात किमान ४० हजार नागरिकांचा बळी गेला. आता देशाच्या एकतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे . फुटीरतावाद्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला जातोय. देशाच्या एकतेला आव्हान दिले जात आहे. पण अनेकदा प्रयत्न करून शत्रू अपयशी ठरला आहे, तोंडघशी पडला आहे. विविधतेतील एकतेचा बोलबाला होतो तेव्हा या बाहेरील शक्तिंना जबर प्रत्युत्तर मिळते , असे मोदी म्हणाले.
काश्मीरमध्ये एक राजकीय स्थिरता येईल असे सांगताना ते म्हणाले कि, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आजपासून केंद्र शासित प्रदेश झाल्याने त्यांची एका नव्या भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालीय. अलिकडेच झालेल्या सरपंचांच्या निवडणुकीत नागरिकांनी उत्साह दाखवल्याने एका मोठा संदेश गेला आहे. आता स्वार्थासाठी सरकार बनवण्याचे आणि पाडण्याचे राजकारण बंद झाले आहे. प्रांतिक भेदभावाच्या तक्रारीही दूर होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा आणि केंद्र सरकारच्या भत्त्यांचाही लाभ मिळेल, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.