Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘ एक ओंकार ‘ रंगवून गुरु नानक यांना एअर इंडियाची आदरांजली

Spread the love

एअर इंडियाच्या वतीने शिख पंथाचे संस्थापक गुरू नानकदेव यांच्या ५५०व्या जन्मवर्षानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर ‘इक ओंकार’ हा शब्द चितारून आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत .  गुरूमुखी लिपीतील या दोन शब्दांनी विमाने रंगवण्यात आली असून मुंबईहून रवाना होणाऱ्या विमानांचाही त्यात समावेश आहे.

एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी सांगितले की, राष्ट्रीय महत्त्व असलेल्या विविध उत्सव व दिनविशेषाला एअर इंडियाकडून विमानांना आगळा रंग दिला जातो. याआधी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीलाही काही विमानांच्या शेपटीवर महात्मा गांधी यांचे चित्र रंगवण्यात आले होते. आता एअर इंडिया नानकदेवांना अशाच प्रकारे अभिवादन करणार आहे.  ‘बोइंग ७८७ जातीच्या विमानाच्या शेपटीवर अशाप्रकारे इक ओंकार लिहिलेले असेल. हे विमान ३० व ३१ ऑक्टोबरला मुंबई-अमृतसर-स्टॅन्स्टेड अर्थात लंडन असा प्रवास करेल.

लंडनमधील अनेक शिख यात्रेकरुंना जन्मवर्षानिमित्तच्या कार्यक्रमासाठी भारतात यायचे आहे. त्यांच्यासाठीच एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.’ हे विमान २८६ आसनी आहे. मुंबईहून सोमवार, गुरूवार व शनिवारी ते उडते. गुरू नानकदेवांच्या जन्मतिथीनिमित्त या विमानातील प्रवाशांना विशेष पंजाबी जेवणाची व्यवस्था देखील एअर इंडियाकडून करण्यात आली आहे. यानिमित्ताने एअर इंडियाने अमृतसर ते बिहारमधील पाटणासाहिब दरम्यानही विशेष विमानसेवा सुरू केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!