अंडे का फंडा : नवरा अंडी खायला देत नाही म्हणून खट्टू झालेल्या बायकोचे अंडी देणाऱ्या प्रियकराबरोबर पलायन ….

कुठे कधी कोणती घटना बातमीचा विषय होईल सांगता येत नाही . उत्तर प्रदेशमधील गोरखपुर गोरखपूर जिल्ह्यात अशीच एक अनोखी आणि विचित्र घटना घडली आहे . या घटनेत एक महिला तिचा पती तिला तिला खाण्यासाठी अंडी आणून देत नाही म्हणून पतीला सोडून प्रियकरासोबत पळाल्याची विचित्र घटना घडली आहे . पोलिसांनी याबाबत सांगितले कि , कैंपियरगंज मध्ये राहणारी हि महिला चार महिन्यापूर्वीही पळून गेली होती परंतु स्वतःच पुन्हा पतीच्या घरी परत आली .
स्वतः पळून गेलेल्या महिलेनेच पोलिसांना सांगितले कि , तिला अंडे खायला आवडतात आणि तिचा पती तिची हि हौस भागवीत नाही म्हणून ती निराश आहे . या अंडे प्रकरणावरून तिचे शनिवारी तिच्या पतीशी भांडण झाले आणि ती कमालीची दुःखी झाली होती. पतीने ती घरात नाही हे पाहून पोलिसांना ती बेपत्ता झाल्याची खबर दिली . पोलिसांनी तिच्या प्रियकराचा शोध घेतला तेंव्हा लक्षात आले कि , तिचा प्रियकरही त्याच्या घरातून बेपत्ता आहे .
सदर महिलेचा पती हा मजूर आहे . त्याच्या जबाबानुसार तो तिच्यासाठी रोज अंडी आणू शकत आंही आणि तिची हि आवड लक्षात घेऊन तिचा प्रियकर तिला खाण्यासाठी रोज अंडी घेऊन घरी येत होता आणि संधीचा फायदा घेत होता. पोलीस पती -पत्नीची हि अनोखी तक्रार पाहून चक्रावले आहेत.