धक्कादायक : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची मुलांसमोरच आत्महत्या , पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दहा महिन्याचा मुलगा आणि सहा वर्षीय मुली समोरच आपल्या जन्मदात्या आईने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रश्मीता राजेंद्र दास वय २६ असे मयत महिलेचे नाव आहे. पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले कि , पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आपल्या चिमुकल्यासमोरच फास आवळत रश्मीता यांनी हे जग सोडले. आत्महत्येपूर्वी आपल्या सहा वर्षीय मुलीला तू लहान बाळाचा सांभाळ कर, असे म्हटल्यानंतर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटने प्रकरणी पती राजेंद्र चंद्रमनी दास वय ३७ याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत रश्मीता यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून तिचे पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मुलांना आई कळण्याच्या अगोदरच सोडून गेल्याच दुःख आहे. आरोपी राजेंद्र हे एका नामांकित कंपनीत कामाला असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी मयत पत्नीला मारहाण केली होती, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.