Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

क्यार वादळ ओमानच्या दिशेने सरकले , मुंबई किनारपट्टीला असलेला धोका टळला, पावसाची रीप रीप मात्र नोव्हेंबरमध्येही चालूच राहील

Spread the love

सर्वत्र होत असलेल्या क्यार वादळाचा धोका आता टळला असल्याचे वृत्त आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या ‘क्यार’ वादळ निर्माण जाहले होते. त्याचा फटका मुंबई सह पश्चिम किनारपट्ट्यावर असणार्‍या कोकणातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ७ नोव्हेंबर पर्यंत मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. तर वातावरणही ढगाळ राहणार आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातही पावसाचा जोर ओसरणार आहे. सध्या क्यार वादळ ओमानच्या दिशेने सरकल्याने मुंबईवरील धोका टळला आहे. ही मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

‘क्यार’ वादळाचा  महाराष्ट्राच्या कोकण किनार पट्टीला मोठा  तडाखा बसला . यामध्ये भात शेतीचे  मोठे   नुकसान झाले  आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ऐन ऑक्टोबर महिन्यात पाणीच पाणी झालेलं चित्र पहायला मिळाले . मात्र आता या चक्रीवादळाचा धोका कमी झाल्याने हळू हळू स्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा या राज्यात २१ नोव्हेंबर पर्यंत पावसाची रिपरिप चालूच राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

क्यार वादळ ताशी बारा किमी वेगाने पुढे सरकत असल्याने रत्नागिरी किनारपट्टीपासून ३०० तर मुंबई किनारपट्टी पासून ३७० किमी दूर असून ओमानकडे सरकत आहे. येत्या ५ दिवसामध्ये क्यार वादळ ओमानमध्ये धडकणार आहे. दरम्यान मच्छिमार्‍यांनी या काळात समुद्रकिनारी, समुद्रामध्ये आत जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!