आदित्य ठाकरे निवडणूक लढवीत असलेल्या मतदार संघात निवडणूक आयोगाने जप्त केले ४ कोटी

Mumbai: Election Commission has seized Rs. 4 crores unaccounted cash in Worli assembly constituency area. More details awaited. #MaharashtraAssemblyElections2019 pic.twitter.com/IeKi3YzcjY
— ANI (@ANI) October 19, 2019
वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने तब्बल चार कोटी तीस लाख रुपयांची रक्कम जप्त केली. ही रोकड एका टेम्पोतून जप्त करण्यात आली आहे. ही धडक कारवाई वांद्रे – वरळी सी लिंक येथील कोस्टल गार्ड मार्गावर करण्यात आली आहे.
याप्रकरणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पोलीस स्थानकात पाचारण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम कुणाची याची चौकशी सुरू आहे. या मतदारसंघात ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे विरुध्द राष्ट्रवादीचे अॅड. सुरेश माने निवडणूक लढवत आहेत.