कारमधुन दारूची तस्करी करणारे दोघे गजाआड, १ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : कारमधून अवैधरित्या दारूची तस्करी करणा-या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री गजाआड केले. दोघांच्या ताब्यातून एका कारसह जवळपास १ लाख ८७ हजार ४०० रूपये विंâमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक ए. जे. कुरैशी यांनी गुरूवारी (दि.१७) दिली.
तौफीक शरीफ पठाण, अहमद खाँ नवाज खॉ पठाण दोघे राहणार डोंगरगाव, ता.सिल्लोड असे अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. एका पांढ-या रंगाच्या कारमधुन दोन जण अवैधरित्या देशी दारूची तस्करी करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक ए.जे.कुरैशी, दुय्यम निरीक्षक एस.आर.वाकचौरे, जी.बी.इंगळे, भास्कर काकड, युवराज गुंजाळ, रविंद्र मुरडकर, जवान संजय गायकवाड आदींच्या पथकाने सापळा रचून डोंगरगाव शिवारात कार क्रमांक (एमएच-२०-एवाय-३५६) अडवली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारची झडती घेतली असता कारमध्ये २५ बॉक्स देशी दारूचे आढळून आले. दारूच्या बॉक्सविषयी तौफीक पठाण व अहमद खाँ पठाण यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली होती. दारूची तस्करी करणाNया दोघाविरूध्द सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.