Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Vidhansabha 2019 : मतदानाच्या दिवशी मतदानोत्तर चाचण्यांचे कल दाखविण्यास निवडणूक आयोगाची बंदी

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. यादिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्यांचे कल दाखवण्यास (एक्झिट पोल) बंदी घालण्यात आली आहे.

Advertisements

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवले जाऊ शकणार नाहीत. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्‍तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्‍यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्‍थान, सिक्कि‍म, तामिळनाडू, तेलंगणा, उत्‍तरप्रदेश या १७ राज्यांधील ५२ विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत. तर, २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचा कल (ओपिनियन पोल), अन्य कल तसेच सर्वे दाखवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!