Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : एम आय एम चे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांचा औरंगाबादेत झंझावाती दौरा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : ‘एमआयएम’च्या औरंगाबाद शहरातील तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दिन ओवेसी तीन दिवसांसाठी येणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी सहा ते आठदरम्यान औरंगाबाद पश्चिम येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री साडेआठ ते दहा यादरम्यान ओवेसींची सभा पैठण गेट येथे होणार आहे.

Advertisements

१८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा यादरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा नवाबपुरा, नगिना मशीद, रेंगटीपुरा, निजामगंज, संजय नगर, कैसर कॉलनी, रोषन गेट, गणेश कॉलनीपर्यंत ही पदयात्रा होणार आहे. सायंकाळी सहा ते रात्री आठदरम्यान सिल्क मिल कॉलनी येथे प्रचार सभा होणार आहे.

Advertisements
Advertisements

रात्री साडेआठ ते दहा या दरम्यान औरंगाबाद पूर्वमधील किराडपुरा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ऑक्टोबर सकाळी नऊ ते ११ दरम्यान बायजीपुरा, जिन्सी, चंपाचौक, लोटाकारंजा, कबाडीपुरा, बुढीलेन, टा‌उन हॉल, बेगमपुरा येथे पदयात्रा करणार आहे. कटकट गेट येथे दुपारी तीन ते पाच यादरम्यान प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!